Powered By Blogger

Monday, May 29, 2017

V-Week :D

७ Feb: rose day... कसंय ना, मी वाट्टेल ते करीन, पण फुलं हातात धरणार नाही, कोणाला द्यायची बातच दूर !!!
८ Feb: प्रपोज day... मायला, आमची इतकी प्रपोजल्स पडून आहेत क्लायंट कंपन्यांत, उत्तरं आली नाहीयेत त्यावर अजून, अजून कोणाला आता काय प्रपोजल पाठवू ??
९ Feb: चॉकलेट day... एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, चॉकलेट हा पदार्थ शेअर करण्यासाठी नसतो, आपला आपण घेऊन खावा, आणि जास्त खाऊ नये, दात किडतात. तस्मात मी का्ही कोणाला चॉकलेट देणं शक्यच नाही.
१० Feb: टेडी day... टेडी बेअर हा पोलर / ध्रुवीय प्राणी आहे, तो इथे मुंबईच्या हवेत आणणं त्याच्या आणि आमच्या दोघांच्या प्रकृतीसाठी धोकादायक आहे. त्या पेंग्विनचं काय झालं लक्षात आहे ना ? त्यामुळे माफ करा, मी हे काही करूच शकत नाही.
११ Feb: प्रॉमिस day... I promise I will not pay any heed to these रिकामपणाचे धंदे करणारे लोक्स.
१२ Feb: hug day.... यक्क... मराठीत लिहूच शकत नाही, साजरा वगैरे कसा काय करतात लोक देव जाणे !!!
१३ Feb: किस day... इतक्या गोष्टींचे कीस पाडले आहेत आजवर विचारू नका... किस डे किस थिंग की वाट लगाई कुछ याद नही...
१४ Feb: व्हॅलेंटाईन day... ईश्वर मृतात्म्यास शांती देवो... प्रेमासाठी जीवन समर्पित केलंन त्याने... असेल बुवा... आम्हाला आयुष्यात अनेक महत्वाची कामं आहेत...
so, if you don't have a valentine on valentine's day, don't get upset...
many people don't have diabetes on the diabetes day !!!
Happily Single बोका

No comments:

Post a Comment