कुठवर जपावा हा मूक दुरावा,
मौनानेच मौनाही उकलायचे...
मौनानेच मौनाही उकलायचे...
किती राहू अबोल, स्वमग्न,
शब्दांचे शब्दांशी खेळणे...
शब्दांचे शब्दांशी खेळणे...
कशास हा हवा लटका रुसवा
तव रुसणे आणिक हसणे द्वैतचि साचे...
तव रुसणे आणिक हसणे द्वैतचि साचे...
तव साथ मिळता अता,
जगणे अवचित स्मित देते...
जगणे अवचित स्मित देते...


No comments:
Post a Comment