जन्म होताच श्वास घ्यायला आणि पहिलं ट्यां करायला शिकवणाऱ्याला नमस्कार,
आपल्या पायांचा योग्य वापर उभं राहण्यासाठी करायला शिकवणाऱ्याला नमस्कार,
हातांनी काम करवणाऱ्याला नमस्कार, हात देणाऱ्यालाही नमस्कार,
कसं आणि कशासाठी जगायचं हे शिकवणाऱ्याला नमस्कार,
नजर देणाऱ्याला नमस्कार, नजर लावणाऱ्यालाही नमस्कार,
चांगलं - वाईट ओळखायला शिकवणाऱ्याला नमस्कार,
प्रेम करणाऱ्याला नमस्कार, न करणाऱ्यालाही नमस्कार,
आपल्यांना नमस्कार, परक्यांनाही नमस्कार,
या भल्या-बुऱ्या काळाला नमस्कार,
आणि, शेवटी, या अनादि अनंत जीवनाला नमस्कार !!! __/\__
चेला बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment