Powered By Blogger

Monday, May 29, 2017

खानारत्न

काही पदार्थ जमलेत की नाही याची पावती नुसतं "वा वा मस्तच झालंय हां", किंवा "हाताला चव आहे हां तुमच्या" असं diplomatic उत्तर ऐकून मिळतच नाही मुळी…

जसं, केळफुलाची भाजी, ही खाताना खाणाऱ्याला शिंक आली नाही तर काही उपयोग नाही.
पुरणपोळी, श्रीखंड खाऊन झाल्यावर पुढच्या १० मिनिटात माणूस घोरायला लागायला हवा.
मिसळ ही नाक, डोळे आणि जीभ यांची विचारपूस करूनच गेली पाहिजे.
सोलकढी, मठ्ठा पिऊन झाल्यावर वाटी खाली ठेवण्यापूर्वी तोंडातून ऑकारान्त ढेकर आली नाही तर काही उपयोग नाही.
बासुंदी, खीर, सार या खाण्याच्या गोष्टी नसून पिण्याच्या आहेत, तेव्हा यांच्या वाट्यांमध्ये चमचे चुकूनसुद्धा ठेवू नयेत, कुणी मागितलेच तर "मिळणार नाही चमचा, वाटी लावा तोंडाला… चमचे मागतायत…" असा स्वच्छ अपमान करावा, मात्र एकदा तोंडाला लागलेली वाटी, संपल्याशिवाय तोंडापासून विलग झाली तर तो तुमचा सगळ्यात मोठा अपमान असेल.

'उत्तम स्वयंपाक करण्याच्या १००१ टिप्स' या आमच्या आगामी ग्रंथातील काही अंश, kvd परिवारहितार्थ…

खानरत्न बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment