आज हपिसातून निघालो तेव्हा पाऊस मस्त भुरभुरत होता, छान गार वारा होता... सहज एक गाणं ओठांवर आलं... 'जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा....' रोम्यांटिक वातावरण होतं. पण हे गाणं कुणासाठी म्हणावं हा यक्षप्रश्न होता...
.
.
.
.
.
.
.
.
.
तसा मी लहानपणापासून स्मार्ट आहे. डोक्यावरची टोपी काढली. गेले काही महिने संगोपन करून वाढवलेल्या माझ्याच बटांना, मी त्या मुजोर वारयासंगे उधळू दिलं.
(टीप : या बटा श्रावण संपताच उतरणार आहेत. आमचा न्हावी गेले अडीच महिने माझ्याकडे खुन्नस नी बघतोय)
केशसंभारप्रेमी बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment