#तूळ_राशीची_साडेसाती #अनुभव
मंदारदादाच्या पोस्टनुसार यथाशक्ती अनुभव लिहिला आहे.
टीप : हा अनुभव अत्यंत वैयक्तिक आहे, तरी वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्याची ही जागा नव्हे याचं भान ठेवून कॉमेंट कराव्यात.

2009 साली तुळेची साडेसाती चालू झाली, तेव्हा काही कल्पना नव्हती साडेसाती काय चीज असते, त्यात काय होतं वगैरे... पण तेव्हा एक प्रकारची मस्ती पण होती अंगात, असं काही नसतं रे, काम करायचं, आपल्याला कशाला काही त्रास होईल वगैरे.
खरं तर माझ्या साडेसातीची चिन्ह मला आधीच दिसायला लागली होती, पण साफ दुर्लक्ष केलं होतं मी.
2005 साली, अभ्यासात बऱ्यापैकी हुशार असलेला मी, बारावीत fail झालो. नंतर 2008 ला डिप्लोमात last yearला KT लागली. जॉब तर मिळाला होता, पण......
पण अचानक पहिला फटका बसला, मी जिथे जॉबला होतो ती कंपनी मुंबईतून गुजरातला शिफ्ट होणार असं सांगत एक महिन्याची नोटीस देऊन मला दुसरा जॉब बघायला सांगितलं गेलं.
काही जणांशी चांगले संबंध होते ते ऐन वेळेस उपयोगी पडले नाहीत आणि जवळपास तीनेक महिने मी नुसताच घरात बसून फुटकळ कामं करत होतो.

जिथून काहीच अपेक्षा नव्हती अशा एका मित्राने शब्द टाकून मला जॉब मिळवून दिला. काम चांगलं चाललं होतं, पण तिथेसुद्धा केवळ नजरचुकीने घात झाला. Vendor कडून आलेलं bill client कडे पोचलं. मला आज आत्ता या क्षणी सुद्धा हा प्रकार कसा घडला याचं आश्चर्य वाटतं. कारण मला साडेसाती काय चीज असते हे तोवर उमजयला सुरुवात झाली होती आणि मी फार काळजीपूर्वक कामं करत असे.
या प्रकारानंतर मालकांनी मजबूत तासली. ते प्रकरण मी निस्तरलं नंतर पण अफाट मनस्ताप झाला, काही माणसं तुटली कायमची. मी तो जॉब सोडला. त्याच काळात माझी so called relationship तुटली आणि मी फार वाईट मनस्थितीत होतो.

तिथून पुढचा काळ जरा बरा होता असं म्हणता येईल.
नंतर मला मिळालेला जॉब चांगल्या कंपनीत, माझ्या अपेक्षेप्रमाणे पैसे देणारा होता. कंपनीत मान होता, काही महत्त्वाचे अधिकार होते. या कंपनीतील काम मी enjoy केलं. नंतर तिथल्याच एका clientने चांगली increment देऊन त्याच्याकडे job ला बोलावलं.

इथे जरा परत गोंधळ चालू झाले. जी स्वप्नं दाखवून मला बोलावलं गेलं ती काही पूर्ण झाली नाहीत आणि भलतीच काही कामं माथी मारली गेली.
साडेसातीच्या पूर्ण काळात घरात मिश्र वातावरण असे. कधी फार वाद, कधी ठीक ठाक... मी अनेकदा sad / depressed असे, पण सुदैवाने काही असेल लोक आयुष्यात होते आणि आहेतही, who made me be on track...
एक मात्र आहे, साडेसातीच्या या काळात मला माणसं कळली, आपली कोणती आणि आपली नसलेली कोणती.
माझा स्वभाव मुळात तूळेचा असल्यामुळे संतुलित विचार हा रक्तातच आहे. सध्या माझ्या आयुष्यात असलेल्या, मला ओळखून असणाऱ्या मोजक्या व्यक्तींची भेट साडेसातीतच झालीय...
शनिदेव तुम्हाला जास्त उडू देत नाहीत. तुम्ही जरा म्हणून मस्ती करा, माज करा, तुम्ही धाडकन आपटलात म्हणून समजा.

मला आर्थिक फटके सुदैवाने बसले नाहीत. मजबूत भरभराटही झाली नाही. पण जे काही पैसे वाढले ते पुरेसे होते.
शेवटी काय तर शनिदेव हे तुमची स्वप्नं ऐकून घेऊन त्या रस्त्यावर फक्त न्याय्य मार्गानेच चालवतात. तुम्ही तुमची कामं सद्सद्विवेकबुद्धीने, प्रामाणिकपणे करा, तुम्हाला कमीत कमी त्रास होईल.
साडेसाती माणसाला humble बनवते. शांत, संयमी आणि balanced माणूस म्हणून तुमचं व्यक्तिमत्व घडतं.
शरद उपाध्येंच्या राशीचक्र मध्येच बहुधा, मी ऐकलं होतं, साडेसाती नुकतीच संपलेल्या माणसाचे पाय धरावे. त्याने जे काही भोगलेलं असतं त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. साक्षात शनिदेवांनी ज्याचा न्याय केलेला आहे अशा आयुष्याच्या अग्नितून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या माणसाला तर प्रणामच केला पाहिजे.

फार काही विचार करू नका. साडेसाती आहे म्हणजे काही वाईट होणारे असं नाही. एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही तर त्याचं खापर साडेसातीवर न फोडता, आत्मपरीक्षण करा आणि त्यानुसार कार्यपद्धतीत सकारात्मक बदल करा. आपली नित्यकर्म सुरु ठेवा. अजिब्बात माज मस्ती प्रौढी करू नका.
शनिदेवांसमोर तुम्ही जितके खरे राहाल तितके ते तुम्हाला सांभाळून घेतात.

नीलांजन समाभासं, रविपुत्रं यमाग्रजं,
छायामार्तंडसंभूतं, तं नमामि शनैश्चरं.
__/\__
तूळेचा बोका.
छायामार्तंडसंभूतं, तं नमामि शनैश्चरं.
__/\__
तूळेचा बोका.

No comments:
Post a Comment