काल रेल्वेचा पास संपला. आज सकाळी जरा लवकर निघून रांगेत लागलो.
फर्स्ट क्लासच्या पाससाठी वेगळी रांग असते एकाच खिडकीसमोर, म्हणजे एक सेकंड क्लास चा पास / तिकीट मग एक फर्स्ट क्लासचं असं ते प्रकरण असतं...
तर, अशा त्या रांगेत माझ्यापुढे एक काका होते, छान शर्ट इन केलेला, हातात छोटीशी सूटकेस, चष्मा असे एकदम छान हुद्द्यावर असलेले वाटत होते. काकांचा नंबर आला.
मोठ्या आवाजात - एक कल्याण रिटर्न द्या.
खिडकीतल्या माणसाने तिकीट दिलं आणि "दस रूपिया खुल्ला देना साब" म्हणून ऑर्डर सोडली.
खिडकीतल्या माणसाने तिकीट दिलं आणि "दस रूपिया खुल्ला देना साब" म्हणून ऑर्डर सोडली.
काकांनी शांतपणे नाहीयेत म्हणून सांगत शंभराची नोट सरकवली. तर "इसका भी खुल्ला नाही है" असं म्हणत ती परत केली गेली.
काकांनी खिशात हात घालून एक डबी काढली, त्यातून stan c चं credit card काढलं आणि म्हणले "मार यातून दहा रुपये, नाहीयेत सुट्टे माझ्याकडे..."
खिडकीतल्या माणसाने आधी नाकारलं, कहाँ इतनेसे के लिए कार्ड मारेंगे साब वगैरे म्हणायचा क्षीण प्रयत्न केला, पण लोकांनी आवाज केल्यावर मात्र चरफडत का होईना ते कार्ड घेतलं आणि स्वईप केलं.
"मोदी जी कहे हैं डिजिटल इंडिया बनो, और तुमको का तकलीफ है कार्ड में ??" हा बिनतोड प्रश्न काकांनी त्या खिडकीवाल्याला त्याच्याच same accent मध्ये असा काही विचारला की सबंध रांग खो खो हसत सुटली.
माझा नंबर आल्यावर मी सुद्धा वट् से कार्ड दिलं, दोन मिनिटांत पास हातात पडला, वर 905 ऐवजी 900 रुपये स्वईप होऊन वट्ट पाच शेकडा पैशांचा डिस्काउंट मिळाला तो वेगळाच...
असाही maximum ठिकाणी digital payment करतोच आहे मी गेली जवळपास पाच सहा वर्षं... आता एक पाऊल पुढे जाऊन discounts, cash backs वगैरेचे फायदे करून घेतोय...
Digital बोका


No comments:
Post a Comment