Powered By Blogger

Monday, May 29, 2017

Ola / Uber / Cab

Wassup मंडळी.
ऊन आत्ता मार्च संपत असतानाच मी म्हणायला लागलं आहे, आणि कामासाठी प्रवास तर सगळ्यांनाच करावा लागतो. हा प्रवास त्यातल्या त्यात सुखकर होण्यासाठी काही tips...
1) भरपूर पाणी पीत रहा.
2) डोक्यावर टोपी घाला.
3) AC cab ने फिरा... 🤔😁😁😁😉😉😉😉
आता बऱ्याच जणांना हा तिसरा प्रकार महागडा वाटतो, पण तसं नाहीये.
Ola किंवा uber च्या service बऱ्यापैकी स्वस्त आहेत, काही वेळा तर रिक्षापेक्षासुद्धा. फक्त त्या विचारपूर्वक / हुशारीने वापरता यायला हव्यात. मला स्वतःला ola जास्त सोयीस्कर वाटते.
या net cabs वापरतानाच्या काही मला सुचत असलेल्या टिप्स... जनरल जनहितार्थ...
1) app install केल्यावर त्याचा नीट अभ्यास करा.
2) pick up point पासून फार लांब भटकू नका, त्यांचं gps खूप अंशी accurate आहे, त्यामुळे drivers बरोब्बर pick up करतात.
3) ride confirm book करण्यापूर्वी car options नीट तपासून बघावे, म्हणजे आपण मायक्रो घेतोय, की मिनी की सेदान हे नीट बघावं. Ride confirm करण्यापूर्वी ride estimate येतं ते जरूर चेक करावं. त्याच अंतरासाठी तुम्हाला गाड्यांच्या प्रकारानुसार कमी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
4) काही वेळेस खिशात फार पैसे नसतात म्हणा किंवा mini / microचं ride estimate अपेक्षेपेक्षा जास्त येत असतं, अशा वेळी शेअर हा पर्याय निवडावा. खूप फरक पडतो बिलात. मात्र एक आहे, तुमचा drop हा तुम्ही गाडीत बसल्याच्या क्रमवार अवलंबून नसून त्या routवर तुमचं drop location आधी येतंय की नंतर त्यावर आहे. शेअर मध्ये तुम्ही कोणाबरोबर ती cab शेअर करणार आहात ते नाव दाखवतं, तुम्हाला comfortable वाटत नसेल तर तुम्ही booking cancel करू शकता. शेअर पास सुद्धा असतो, तुम्हाला एखाद्या रूटवर रोज प्रवास असेल तर हा पर्याय स्वस्त आणि मस्त आहे.
5) canc करायला सुद्धा time limit आहे. Limit नंतर केलेलं cancellation chargeable असतं, तेव्हा ती काळजी घ्यावी.
6) जर तुम्हाला सतत फिरायला लागत असेल, आणि cab तुम्हाला पटण्यासारखी / परवडत असेल तर prime option घ्यावा, यामुळे booking list मध्ये तुम्हाला priority मिळते, top rated driver मिळतात, free wifi मिळतं आणि चक्क mini च्या किमतीत sedan मिळते... सगळ्यात imp म्हणजे peak pricing लागत नाही !!!
7) विसरून गेलेल्या वस्तू परत करणारे प्रामाणिक रिक्षा / टॅक्सीवाले आता अपवादानेच पाहायला मिळतात. पण या services मध्ये तुम्ही cust care ला फोन करून सांगितलंत तर योग्य खातरजमा करून तुमची वस्तू परत मिळतेच मिळते. मी एकदा mac book laptop गडबडीत विसरलो होतो, driver ने नेऊन ऑफिसात जमा केला, मला फोन करून तसं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मी तो collect केला.
8) safety features फार चांगले आहेत. तुम्ही book केलं की sos चं एक बटन येतं screen वर, तसंच तुमची ride track करण्यासाठी एक web link असलेला sms येतो, तो एखाद्याला पाठवून त्रयस्थ व्यक्ती तुमच्या ride route वर लक्ष ठेवू शकतो.
9) तुमच्या पूर्ण ride चा नकाशा, driver चं नाव, फोटो, mobile number हे सगळं बिलात छापून येतं.
10) मला स्वतःला m-wallet मध्ये पैसे भरायला आवडत नाही, पण ज्यांना cash carry करायची कटकट वाटत असेल त्यांनी wallet मध्ये पैसे भरून ठेवावे, बऱ्याच ऑफर्स असतात.
11) तुम्ही cabs pre book सुद्धा करू शकता. तारीख, वेळ टाकायची, त्या वेळेस cab येऊन उभी राहते. पंधरा मिनीटं आधी driver फोन करतो.
12) आपण outstation, rental सारखे options आपल्या सोयीनुसार / गरजेनुसार वापरू शकतो, सगळी माहिती डीटेल दिलेली असते.
13) काही ठिकाणी सध्या रिक्षा सुद्धा ola मध्ये enrolled आहेत, normal meter पेक्षा ते स्वस्त पडतं.
तर, अशा या टिप्स... आशा आहे, तुम्हाला उपयोगी पडतील.
Traveller बोका.

No comments:

Post a Comment