Powered By Blogger

Monday, May 29, 2017

कूट

अरे एѕѕѕѕѕѕѕѕ भल्या माणसांनोѕѕѕѕѕѕѕѕѕ… जरा माणसात या… फार अपेक्षा नाही आमची, आम्हाला कळेल असं बोला की काहीतरी. काय ते कूट काय, प्रहेलिका काय, प्रच्छन्न काय… अरारारारारा… इथे या तुमच्या पोस्ट्स वाचून आमचे चिमुकले मेंदू छिन्न विच्छिन्न व्हायची वेळ आली. आयला, एक शब्द झेपला तर शपथ. पुन्हा ते 'उत्तर मेसेजा, कमेंटू नका' वगैरे दिव्य मराठी !!! कशाचा कशाला पत्ता लागत नाही. आणि पोस्त पडली की दोन पाच मिनिटांत उत्तर पाठवलं वगैरे कॉमेंट्स येतात. एवढा वेळ तर या पोस्ट वाचण्यात जातो माझा. कूट म्हणलं की आम्हाला एक तर दाण्याचं कूट आठवतं, किंवा मग 'तू फक्त नाव बोल ना भाय, कुनाला कुटायाचा, लै आव्वाज करतोय काय तो ?' असा प्रश्न पडतो.  बाप रे… दिवसेंदिवस अवघड होत चाललंय हे कूट प्रकरण…

विच्छिन्न बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment