असा दाटू येता भावनांचा पसारा,
असा भाव होतो भाबडा मनाचा,
असे हालते हळुवार आत काही,
जसा बांध हा हलके तुटावा...
त्या दिठीने उबारा मज अता द्यावा,
जसा मिळावा नद धुंद सागराला...
असे भिजावे मन आज माझे,
जसा एक तारा गळावा...
मी तोच, मला काय त्याचे,
असा स्फुट भास व्हावा,
अन, असा यावा शहारा
माझे मी पण गळावे, आपलेपण यावे...
© कवी-बिवी बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment