Powered By Blogger

Monday, May 29, 2017

Bday

नमस्कार मंडळी…
कालचा दिवस, माझा वाढदिवस खूप आनंदात गेला. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. इतकी वर्ष कार्यबाहुल्यामुळे वाढदिवशी सुद्धा मला घरी वेळ देता येत नसे, पण यंदा अनायसे रविवार आल्यामुळे घरच्यांबरोबर शांतपणे वेळ घालवता आला. सकाळी देवदर्शन झालं. दुपारचं जेवण मी स्वतः तयार केलं. ( पार्टीचा वायफळ खर्च वाचवला. :P कोकणस्थ !!! ) संध्याकाळी आईनी ओवाळलं तेव्हा खूप बरं वाटलं. व्यवस्थित कमवत असून सुद्धा आईकडून मिळालेली लहानशी गिफ्ट मला हवीच असते. बाबा आणि काका काकूनी 'हा वाढदिवस तुझ्या ब्याचलर आयुष्यातला शेवटचा वाढदिवस असो' असा आशीर्वाद दिला. मग रात्री मस्त पावभाजी, पुलाव आणि आईसक्रीम !!! अनेक वर्षांनी अगदी शांत आणि आनंदात वाढदिवस व्यतीत केला.

केव्हीडीकरांनी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत. असंच प्रेम कायम ठेवा. शुभेच्छा पाठीशी असू द्या.
पुन्हा एकदा धन्यवाद !!!

आपलाच,
भारावलेला बोका. ( ओंकार आठवले )

No comments:

Post a Comment