आयला, कधी नव्हे तो, मोठा ग्रूप जमवून बसलो, तिचा उल्लेख चंद्र म्हणून केला ( अर्थातच छुपा ), चंद्राचा उल्लेख असलेली गाणी खास तिला उद्देशून, तिच्या लक्षात येईल अशा गोड आवाजात म्हणली, दूध आणि 'चंद्र' यांत जास्त गोड कोण यावर चर्चा केली, चंद्रच जास्त गोड असं पब्लिककडून मान्य करवून घेतलं, आणि एवढ्यात चंद्राला फोन आला, ' उद्या ओफिस आहे, घरी या अन् झोपा, दूध उद्या सकाळी प्या, आत्ता जागत बसू नका ' झाSSSलं ... चंद्र गपगुमान डोळ्याच्या कोपर्यातून बघत घरी गेला. आणि केशर ड्रायफ्रूट्स घातलेलं मस्त आटीव दूधसुद्धा अगोड वाटायला लागलं.
गोडभक्त बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment