दुष्काळी भागातून उद्धवमहाराजांचा दौरा चालला होता, गावात धामधूम होती. कुणीतरी बोकोबांना विचारलं, "काय बोकोबा, भाषणास दिसला नाहीत?" "कुणाच्या? दादूच्या ?? छ्यट, अरे, दुष्काळ पडलाय हितें, तर भाष्णे कसली देतोस? तांदूळ दे !! हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून सामना वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय आणि हा हिथं… ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास… तुम्ही बाकी खुळेच हो… आला दादू, चाल्ले बघावयास !!! "
बोचरा बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment