Powered By Blogger

Monday, May 29, 2017

दिवास्वप्न

"दिवास्वप्न"

**** खाली लिहित असलेला प्रसंग आत्ता घडलेला आहे. असं कसं, शक्यच नाही वगैरे शंकासूर इथे उपस्थित करू नयेत.

आज जेवण अंमळ जड झालं होतं. आणि जेवण झाल्यावर दणदणीत खर्वस खाल्ला होता. साहेब मीटिंगला बाहेर गेल्यामुळे मला आज आराम करायला मोकळं केबिन होतं. ऑफिस मध्ये कुणीच नाही, आणि जे आहेत ते माझ्या केबिन मध्ये येत नाहीत. तर, पेपर वाचता वाचता डुलकी लागली. मी माझ्या घरात टीव्ही बघत लोळत पडलो होतो. हातात आयफोन होता. ( माझं एक खरं स्वप्न ) त्यावर पु. ल. देशपांडे मला "पाळीव प्राणी" ऐकवत होते. आणि तेवढ्यात फोन वाजला. अनोळखी नंबर होता, मी उचलला, आणि अत्यंत गोड आवाजात,
"हेल्लो, काय करतोयस?"
मी : "कोण बोलतंय ?"
आवाज : "ते सोड रे, ऐक ना… "
मी : "ऐकवा"
आवाज : "माझ्या मनीचे हितगुज सारे, ऐकशील का… माझा होशील का, बोका????"
मी : क्क्क्काय ??? ( ओरडलोच जवळ जवळ ) कोण बोलतंय ???
आवाज : मी मनी रे…

च्यायला, माझ्या 'क्क्क्काय' चा आवाज स्वप्नातून सत्यात आला आणि ऑफिस चा प्यून "काय झालं सर, काय झालं सर" असं विचारात केबिन मध्ये आला… शिंचा पाच मिनिटं उशिरा आला असता तर तो अनोळखी नंबर बघून घेतला असता राव…

मनी वसे ते स्वप्नी दिसे फेम बोका,
ओंकार आठवले.

No comments:

Post a Comment