Powered By Blogger

Monday, May 29, 2017

Friends

काय रे xx,
किती दिवस झाले काही बोलणं नाही, फोन नाही, msg नाही... काय चाललंय काय तुझं ?? इतका मोठा झालास का तू ?? काही प्रॉब्लेम असेल आयुष्यात तर बोल, आत्ता येतो तिथे, लेका मित्र कशासाठी आहोत आपण ??
हे पत्र मिळालं की लगेच उत्तर पाठवणे. नाहीतर शो कॉज नोटीस पाठवण्यात येईल. तिचंही उत्तर दिलं नाहीस तर डायरेक्त घरी येऊन चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या जातील.
तुझाच,
बोका.
बोक्या,
Xxxx पत्र वगैरे लिहिण्याचा सभ्यपणा तू करू नकोस, तुला तो प्रकार शोभत नाही, आणि झेपत त्याहून नाही.
येत्या शनिवारी घरी ये, समजुतीच्या चार नव्हे चाळीस गोष्टी करू. आणि नोटिशीची भाषा कोणाशी करतो बे ?? शाळेत असताना पत्रलेखनाच्या प्रश्नाचं उत्तर माझं बघून लिहायचास विसरलास का ??
ता. क. -- तुझी वहिनी शनिवारी घरात असते, तेव्हा जी चर्चा करायची आहे, तिचे मुद्दे आधी पाठव, ऐनवेळी काहीतरी बोलून माझी हवा टाईट करू नकोस.
भेटूच,
तुझा मित्र
.
.
.
तर मंडळी, सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, मित्र म्हणावे असे लोक आयुष्यात फार कमी आहेत. पण जे आहेत ते हे असेच आहेत... असो...
तार खात्यातला,
बोका

No comments:

Post a Comment