Powered By Blogger

Monday, May 29, 2017

Kvd मित्र

तसा मी माणसांत विचार करून मिसळणारा, पण केव्हीडी वर आलो, आणि अनेकविध व्यक्ती आपोआप जोडल्या गेल्या माझ्याशी. या सगळ्या ग्रेट माणसांनी माझं लहानसं आयुष्य समृद्ध केलं आहे. सदैव मला पोझीतीव्ह विचार करायला लावणारा Sachin, "भीड रे तू, आम्ही आहोत" असा विश्वास देणारे Manoj Lele काका, माझ्यावर आई आणि खऱ्या मावशीपेक्षा सुद्धा खूप जास्त माया करणारी माझी Archana मावशी, कसं लिहावं, हे पु. लं. च्या नंतर ज्यांचे लेख वाचून समजून घेण्याचा अजूनही प्रयत्नच करतोय, ते श्रीनिवास चितळे काका, ज्यांच्या लेखनाचा अभ्यास करून काही बोध घ्यावा असे @Shrirang Chitale काका, माझ्यामधलं परिस्थितीनुरूप बोथट होत चाललेलं ब्राह्मण्य आपल्या झणझणीत अंजनानी पुन्हा धारदार करणारे आपले संत काका, ज्यांच्या बद्दल मला फक्त आदरच वाटू शकतो असे Upendra Chinchore काका, अजिबात पर्सनल ओळख नसलेली पण सहजपणे माझी वहिनी झालेली Shital वहिनी, मी गोव्याला गेलो असताना कॉलेजच्या वेळा सांभाळून मला भेटायला आलेली @Aishwarya Joshi, नेहमी अधून मधून फोन करून माझ्या तब्बेतीची आणि इतर गोष्टींची चौकशी करणारा @Sarang Kulkarni, "कोकणात तुझं हक्काचं घर आहे आता" असं मला सहजपणे सांगणाऱ्या Rajani Joshi ताई, खट्याळ, मिश्किल असे Pratap Joshi आणि @Swati Joshi ताई, "साल्या, कामं नंतर, आधी तब्बेत सांभाळ" असा प्रेमळ दम देणारा माझा Shivaram दादा, माझ्यावर मोठ्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणारी माझी Smita ताई… सकाळचा चहा ज्यांच्या लेखाशिवाय उतरत नाही अशा Varada Joshi आणि माझी Priya A. Pandit   तायडी, मस्कतहून येताना माझ्यासाठी आठवणीनी गिफ्ट घेऊन येणारा Ashutosh Paranjape  "कधी ट्रेनच्या गोंधळात अडकलास तर ठाण्याला आमच्याकडे ये" असं सांगणाऱ्या Vishakha तै, का कुणास ठाऊक पण जिच्याशी थोडं भीत भीतच मैत्री केली ती माझी हैदराबादकर मैत्रीण मानसी तुषार........ अरे किती नावं घेऊ मी… खरंच, या सगळ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात मित्र म्हणून आल्या… माझं पूर्वसंचित जबर असलं पाहिजे.… जितकी नावं सुचत गेली तितकी इथे घेतलीत, ज्यांची नावं मी इथे घेतली नाहीयेत ते माझे फ्रेंड्स माझ्यावर अजिब्बात नाराज बिराज होणार नाहीत याची खात्री आहे मला.

मंडळी, माझ्या आयुष्यात आलात, आपली मैत्री अखंड कायम राहो, तुम्हा सगळ्यांना सदैव सगळं सुख, समाधान, आनंद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!! __/\__
ह्याप्पी फ्रेंडशीप डे !!!

फ्रेंडली बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment