Powered By Blogger

Monday, May 29, 2017

गूळपोळी

बरं ऐका, मी काय म्हणतो,
.
.
गूळपोळी मकर संक्रांतीला करतात रे बाबांनो... गूळ चिक्कीचा घालत नाहीत हां आणि... नीट बघून ठेवा, नाहीतर आपलं गूळपोळी म्हणलं की घाला कोणताही गूळ असं नाही चालायचं... चिक्कीचा गूळ तिळगूळ करायला... पोळीसाठी साधा गूळ. मकर संक्रांतीची तारीख नीट बघा... आणि गूळपोळ्या खायच्या असतात माणसाला, त्या हिशोबाने भाजा... तव्याइतक्या टणक करू नका.... आणि हो, आपले कुटुंबीय आणि आप्तेष्ट यांना पुरेशा होतील इतक्याच करतात बरं... नाहीतर पुढचा आठवडाभर नाश्ता आणि दोन्ही जेवणांना मेनू काय तर गूळपोळी असं नको व्हायला...
.
.
.
.
.
.
काही नाही...
जनहितार्थ जारी.
आईच्या हातच्या गूळपोळीचा फ्यान,
बोका

No comments:

Post a Comment