जुने दिवस मस्तच होते...
लहान असताना शाळेला सुट्टी लागली की मे जूनच्या आसपास आम्ही कोकणात जायचो.
काकाचं मोठ्ठ घर आहे, चारी बाजूने झाडं आहेत. घराच्या मागच्या बाजूला लाखी बाग, आणि एका बाजूला गोधन.
जवळपास नऊ दहा गायी आणि पाचेक म्हशी होत्या तेव्हा.
काकाचा मुलगा आणि मी साधारण एकाच वयाचे असल्यामुळे आमची मस्त गट्टी जमायची.
तो बऱ्यापैकी शांत असला तरी मी गेलो की दोघांना एकत्रच शिंगं फुटायची.
काकू फार प्रेमळ आमची, मस्ती करू देत असे.
तिथे गेल्यावर सकाळी गोठ्यात काकू आणि आजी धार काढत असत तिथे लुडबुड कर, सुपाऱ्या वाळवत घालायला मदत कर, नारळ सोलून दे, कोकमात हात घाल, फणसाची साठं करायला मदत कर, मधेच एखाद्या कलमावर चढायचा प्रयत्न कर वगैरे मस्ती नेहमीची होती.

काकाला एकदा बागेत दोन कुत्र्याची पिल्लं सापडली होती. ती त्याने सांभाळली. दिसायला एकदम किरकोळ अंगाची असली तरी मोठी झाल्यावर ती एकदम चलाख आणि चपळ बनली होती. त्यांच्याशी आम्ही बरेच खेळत असू.
असाच एकदा गावी गेलो असताना गोठ्यात एक रेडा बांधलेला दिसला. तो काकाचा नाहीये, काही तरी कामासाठी आणला आहे हेही मला सांगण्यात आलं. ( बातमीदार - भाऊ. ) आधी मला कळलं नाही आणि मी नेहमीच्या सवयीने गोठ्यात गेलो तास तो डुरकला. मी घाबरलो, पण त्याची धास्तीच वाटायला लागली... फारच चिडका होता तो... इतकी की माझं गोठ्यात पाऊल पडेनासं झालं...
इतकंच काय तर माझ्या भावाला सुद्धा त्याची भीती वाटायची. कारण रेडा कोणालाच ऐकायचा नाही. ( रेडा का आणला होता हे कळण्याचं वय नव्हतं ते )
एकदा आम्ही त्याला धडा शिकवायचं ठरवलं. रात्री निजानीज झाल्यावर आम्ही दोघे हळूच बाहेर आलो. गोठ्यातून म्हशीच्या रेकण्याचे आवाज येत होते... त्याहून जोरात रेडा रेकत होता... बारीक दिवा मिणमिणत होता. म्हणलं काही तरी गडबड दिसते. भावाने कुत्रे बरोबर घेतले, गोठ्याचा दरवाजा उघडला आणि दिले ना सोडून आत... आणि नंतर जो हलकल्लोळ माजला.... विचारता सोय नाही... रेडा आला अंगावर आमच्या, आम्ही सुळकन बाजूला होऊन एका झाडामागे लपलो, तिकडे कुत्र्यांच्या आवाजाने बिथरून म्हशीने कासरा तोडला आणि ती जाम उधळली... या परिणामांचा विचार आम्ही दोघांनीही केलेला नव्हता...

आता रे काय करायचं... तितक्यात काकाचा 'कोणाय रे गोठ्यात??' असा जरबेचा आवाज आला आणि आम्ही जागेवर पुतळे झालो...
कुत्र्यांनी भुंकून गोंधळ घातला होता, रेडा गायब होता, म्हैस वाडीत घुसून लहान झाडांची वाट लावत होती... आणि काका आमच्या समोर हातात दांडा घेऊन उभा होता.
गड्यांनी कसं बसं म्हशीला धरलं आणि पुन्हा गोठ्यात नेऊन बांधलं.
काका - 'काय केलंत??'
आम्ही - गोठ्यात आलो होतो, म्हैस जोरात रेकत होती... बघायला आलो...
हे ऐकून काकाने दांडा योग्य ठिकाणी चालवला आणि किमान दोन दिवस तरी आमची भारतीय बैठक पूर्ण होणार नाही याची व्यवस्था केली... काकू मध्ये पडली आणि माही सुटलो.
रेडा दुसऱ्या दिवशी सकाळी गावात मिळाला, त्याला धरून आणलं गेलं.

आम्हाला विचारल्याशिवाय गोठ्यात जायचं नाही असं वचन घेऊन 'कोणाला सांगू नका' ही आमची विनंती मान्य करण्यात आली.
तह झाला असला तरी, 'म्हैस का रेकत होती' हा प्रश्न मात्र तेव्हा अनुत्तरितच राहिला होता...

--
खोड्याळ बोका.
खोड्याळ बोका.

No comments:
Post a Comment