Powered By Blogger

Monday, May 29, 2017

स्वप्न

माझं आत्ता वय अठ्ठावीस, पन्नाशी पर्यंत काम करायचं, त्या नंतर कोकणात जायचं आणि शेवटपर्यंत तिथेच राहायचं असं स्वप्न आहे. महिन्याचा खर्च भागेल इतके पैसे तेव्हा मिळाले तरी पुष्कळ झालं. बैठं कौलारू घर, पडवीत झोपाळा, एक खोली झोपायला, एक किचन आणि एक हॉल… बास… निसर्गाच्या जवळ, उत्तम संगीत ऐकत संध्याकाळी घालावाव्यात असं वाटतं. घराच्या भोवती थोडीफार नारळ, आंबे, फणस, सुपारी वगैरे झाडं असावीत. गोठ्यात म्हैस असावी. एक दांडगा कुत्रा पाळावा. एक जीप असावी, आणि सुखानी राहावं असं स्वप्न आत्ता बघतोय. त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने अजून वाटचाल सुरु झालेली नाही. पण विचार मात्र सिरीयसली करतोय.…

प्लानर बोका,
ओंकार आठवले.

No comments:

Post a Comment