Powered By Blogger

Monday, May 29, 2017

प्रपोज डे

आज कायसा तो प्रपोज डे आहे म्हणे… आज मुलं मुलींना किंवा मुली मुलांना प्रपोज करतात म्हणे… 'माझा होशील का, बोका' असं काहीसं म्हणतात… मग ते प्रपोजल स्वीकारलं किंवा नाकारलं जातं… कॉलेजात असताना एकदा हा उद्योग करून पाहिला होता…. फुक्कट खिशाला खार लागतो आठवडाभर… मनापासून प्रेम करावं अशा मुली असतीलही, पण मंगळाच्या मुलींसारख्या त्या आम्हाला कधी लाभल्या नाहीत… तेव्हापासून मी या असल्या नसत्या भानगडीत पडलो नाही… आपलं प्रेम फक्त चांगल्या म्युझिक वर, कार वर आणि स्पोर्ट बाईक वर …

No comments:

Post a Comment