कुणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण मोठ्या किंवा लहान पडद्यावर जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला बघणारे लाख्खो लोक आपल्याला त्या रूपात बघून काय विचार करत असतील याचं भान ठेवायला काय हरकत आहे ? दिखता है वो बिकता है हा जरी आजच्या जगाचा मंत्र असला तरी काय दाखवायचं हे तुम्हाला कळायला नको ? आयटम सोन्ग्स मिटक्या मारत बघणारी मनुष्यांची जमात जितकी वाईट तितकीच आपल्या सोयीनुसार कथानकाची गरज निर्माण करणारे लोकही तितकेच वाईट. आणि या बोल्ड सीन्स च्या बाजूने लढणाऱ्या स्त्रिया पाहिल्या की मती गुंग होऊन जाते. आपण ट्यालेन्तेड आहोत हे जेव्हा तुम्हाला ओरडून सांगावं लागतं तेव्हाच तुमच्यातल्या कलाकाराचा पराभव झालेला असतो. जेव्हा तुम्ही म्हणता, या गोष्टी अक्खी दुनिया करते, नैसर्गिक गरज आहे, तेव्हा, त्याच्या विवक्षित जागा, वेळा सुद्धा आहेत हे सोयीस्करपणे विसरू नका. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली खूप सूक्ष्म रेषा सांभाळणं गरजेचं आहे. भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांना तुमचे हे सिनेमे दाखवू शकणार आहात का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा. त्याचं उत्तर काय येतंय ते तुमचं तुमच्यापाशी. पण जी सुसंस्कारित नवी पिढी घडवण्याच्या तुम्ही वल्गना करता, ते संस्कार जर हे असतील, तर यापरती मोठी शोकांतिका नाही….
.
.
.
.
.
.
.
.
.
कुणाला कितीही बुरसटलेले वाटले तरी हे माझे विचार आहेत. आणि मला तरी विचार व्यक्त करण्यात काही गैर वाटत नाही.
© वैचारिक बोका ( ओंकार आठवले )


No comments:
Post a Comment