कितीही मोठा झालो तरी, कुणीही काहीही म्हणलं तरी, मी श्रीखंड वाटीत न घेता, माझ्या चांदीच्या छोट्या ताटलीतच अनेकवेळा घेऊन, चमचा वगैरे वापरण्याचा अगोचरपणा न करता, उजव्या हाताच्या पहिल्या बोटानीच खात राहीन. कढईतून थेट पानात येणारी टम्म फुगलेली गरमागरम पुरी बक्कन बोट घालून फोडून, आतून येणारी गरम वाफ हातावर घेत, ताज्या पुऱ्यांना येणारा सुगंध अनुभवत राहीन. मनसोक्त ओरपत राहीन आणि पोटाकडून "आता पुरे" असा संदेश ढेकररूपानी आल्यावरच थांबेन. त्यानंतर येणारी गुंगी म्हणजे सुख…
गुंगीत असलेला बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment