काही प्रश्नांची खरी उत्तरं हवी आहेत :
१) पुण्यासंदर्भात काहीही पोस्ट पडली की कोमेंटमध्ये किमान एकदा आणि कमाल कितीहीवेळा 'पुणे तिथे काय उणे' असं का लिहितात ??
२) कोणत्याही कपलनी फोटो टाकला की 'जोडी कमाल की', 'रब ने बना दी जोडी', 'मेड फॉर इच अदर', 'लुकिंग ऑसम टुगेदर' असं का लिहितात ??
३) एखाद्या मुलीनी सेल्फी टाकला की तो कितीही विद्रूप दिसत असला तरी लोक्स 'looking beautiful' 'looking gorgeous' अशा कॉमेंट का करतात ??
४) मुलानी टाकलेल्या फोटोत तो कितीही पेद्रू दिसत असला तरी 'लुकिंग ह्यांड्सम' 'सॉलिड डूड' वगैरे का लिहितात ??
५) पोस्टकर्त्याचं आडनाव 'आठवले' असेल तर 'रामदास आठवले तुमचे कोण' हा प्रश्न विचारण्याची अनावर हुक्की लोकांना पुनःपुन्हा का येते ???
बघा जरा…. उत्तरं सापडत असतील तर सांगा मला.
पंजा मारायच्या तयारीत असलेला बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment