गर्दीने खचाखच भरलेलं घाटकोपर स्टेशन,
एका बाकड्यावर बसलेली ती, हात त्याच्या हातात...
ती : कधी निघतोयस ?? थंडी असेल ना खूप तिकडे ??
तो : उद्या सकाळी... थंडी असणारच ना युरोपात ??
ती : काँटॅक्त कसा करायचा ?
तो : तिथे पोचल्यावर फोन चालू करून पहिला फोन तुलाच असेल...
ती : परत कधी ??
तो : चार वर्षं...
ती : फार आठवण येईल तुझी...
तो : माहितीय...
ती : नको ना जाऊ... ( एका क्षणात रडायला लागेल अशी परिस्थिती )
तो : रडू नको वेडाबाई... जावं लागेल... एक काम कर... ही चेन ठेव तुझ्याकडे...
ती : .... हळूच त्याच्या हातावर मुका देते...
दोघे उठून चालू पडतात...
त्याने तिच्या नकळत टिपलेला एक अश्रूबिंदू हलकेच माझ्या हातावर पडलेला असतो... पुसून टाकावासा वाटत नाही इतकंच...
बोका...
( आत्ताच घडलेला प्रसंग... )


No comments:
Post a Comment