या नाट्यगीतांचं माझ्याशी काही तरी वेगळंच नातं आहे… बाकी कशाहीवर लिहायला बसलो तरी लिहू शकतो, पण नाट्यगीतं म्हणलं की माझी तरी मति गुंग होते. सुचेना होतं मला. एक एक गीत साफ भूत आहे. जवळपास तास - दीड तासभर मी ध्यानाला बसल्यासारखा गाणी ऐकत होतो…अभिषेकी बुवांचं घेई छंद ऐकताना डोळ्यांच्या कडांपाशी पाणी नक्की कुठून जमा होतं कोण जाणे… छ्या ही न उतरणारीच भुतं… उतरूही नयेत…
नाट्यगीतांनी झपाटलेला बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment