आयुष्यात भौतिक असं बरंच काही मिळेल न मिळेल... पण मी काय लेव्हलचा अभागी आहे बघा.. ज्यांना मी सगळ्यात जास्त मानतो, ज्यांच्या अनेक लेखांची ओळ न ओळ मला त्याच्या आरोह अवरोहासकट पाठ आहे, ज्यांच्या व्हिडिओजची पारायणं होतात... ज्यांच्या व्यक्ती आपल्यासारख्याच वल्ली वाटतात... हे सगळे गणगोत जवळचे वाटतात... त्या सगळ्यांचे कर्ते पु. ल. मला कधीच प्रत्यक्ष भेटले नाहीत...
हे देव तरी कसं हxxxर बघा... जे हवं ते आधी घेऊन जातंय... कशाला आला होता रे पृथ्वीवर...
त्यांचं लिहिलेलं वाचताना, सेकंदभरपूर्वी खदखदून हसणारा माणूस पुढच्या ओळीला क्षणार्धात डोळे टिपताना आढळू शकतो...
पु लं वाचतानाची बेसिक आणि mandatory requirement म्हणजे तुम्हाला 'हृदय' आणि 'समज' असलीच पाहिजे...
असो, देवानी आमची लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या या देणग्या, न मागता दिल्या होत्या, न सांगता परत नेल्या...
सगळ्यात मोठी खंत एकाच गोष्टीची वाटत राहील की या जन्मात मला भाईकाकांची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही, त्यांच्याशी बोलता आलं नाही...
बोका


No comments:
Post a Comment