Powered By Blogger

Monday, May 29, 2017

एय मुहबत

काही  गाणी का कोण जाणे, रोमांचित करतात. कधीही ऐका. तितक्याच इंतेन्सिटीने भिडतात…

कालचीच गोष्ट, रात्री साधारण साडेआठ - नऊची वेळ असेल… बऱ्यापैकी तब्बेतीत पाऊस पडत होता, अचानक लाईट गेले, सगळीकडे गुडुप्प अंधार.
बाहेर पावसाचा आवाज, आजूबाजूला कोणी नाही. त्यात काल दिवसभर जरा विचित्र मनस्थिती होती. काही जुन्या आठवणी, काही राहून गेलेलं,
काही अपूर्ण राहिलेलं…मन बर्यापैकी सी सॉ खेळत होतं… बाहेरचा पाऊस, मनातली वादळं…
त्याच तंद्रीत मोबाईलवर गाणी लावली गेली… सुरुवातीची काही गाणी मूड नसल्यानी चेंज केली गेली.
आणि, अनेक दिवसांनी, एका अवीट गोडीच्या गाण्यावर मी अडकलो…लूप मध्ये गाणं सेट केलं गेलं.

बाहेरचा पाऊस माझ्या डोळ्यांच्या कडांवर दवबिंदू होऊन कधी उतरला कळलंच नाही. सहन होत नाही, कुणाला सांगता येत नाही अशी ही अवस्था हो… करणार काय माणूस… मी अनेक वेळा एकटा असलो की गाणी ऐकता ऐकता गुणगुणतो… काल आवाज आतून, खोलवरून येत होता… खरा आवाज होता बेगम अख्तर बाईंचा, आणि असा दबका, घोगरा आवाज होता माझा.

आणि ते गाणं होतं, 'एय मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया'

काय एकेक शब्द आहेत… आहा…अजून असाच एक महा-कातील पार्ट याच गाण्यातला, 'जब हुआ जिक्र जामने मे, मुहब्बत का शकी, मुझको अपने दिल-ए-नाकाम पे रोना आया' … काय राव… कत्तल करायला घेतात बाई… असो… आता काही दिवस तरी या नशेतून बाहेर येणार नाही मी…

बेगम अख्तरी बोका

No comments:

Post a Comment