मित्र : काय श्रीमंत, किती दाढी वाढवली आहे ?? पैसे नाहीयेत का ??
मी : पैसे आहेत रे. बरें कमावतो मी.
मित्र : मग जरा त्या न्हाव्याच्या बोडक्यावर घाला की, आणि जंगल साफ करून घ्या..
मी : अरे वत्सा !!! गालावरून हात फिरवणारी कोणी असेल तर दाढी करण्यात अर्थ आहे. आमच्या नशिबी सदा मुस्काटफोडीच !!! तस्मात, त्यातल्या त्यात तो फोर्स थोडका का होईना, absorb व्हावा म्हणून आम्ही दाढी वाढू देत आहोत.
मित्र : xx%$&*
मी : आणि आत्ता गालावरून हात फिरवणारी, बिनपाण्याने केव्हा करेल याचा काही अंदाज नाही... तेव्हा आहे असंच असू दे...
मित्र : आपले चरण कुठे आहेत ??
मी : हे बघ...
.
.
.
.
.
.
दोन तास झाले कंबर दुखतेय... पाय ओढून पाडला वाटतं मला त्यानी...
दाढीवाला बोका


No comments:
Post a Comment