[29/05, 5:01 pm] Kanchan Lele: "काही गरज नाही मला तुमच्या पुरस्काराची, मी डोळसपणे हाती घेतलेलं श्रींचं कार्य उत्तमपणे माझ्या हातून पार पडलं, मी धन्य जाहलो. शिवराय मनामनात पोहोचले, त्याला माझा हातभार लागला, या परता मोठा पुरस्कार नाही. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला तेव्हाच मला महाराष्ट्र भूषण मिळाला."
पुरस्कारावरून इतका घाणेरडा गहजब, इतकी राजकारणं होत असताना, शांत स्वस्थ असलेल्या बाबासाहेबांनी असं जर म्हणलं, तर या सर्व विरोधकांना मस्त चपराक बसेल असं मला वाटतं. अर्थात या सर्व पुरस्कारांच्या पलीकडे गेलेलं त्यांचं कार्य आहे. बाबासाहेब, इतकं तरी बोलाच तुम्ही.
बाणेदार बोका,
ओंकार आठवले.
[29/05, 5:01 pm] Kanchan Lele: ओ भौ, वाइच पुडी देता का, तुमी टूब द्या चुन्याची… पन मी काय म्हंतो, त्या बाबासाहेबास्नी नगं देऊया पुरस्कार. जावद्या सोडाच तो इषय, त्यांनी अक्खी जिंदगी घालवली गड-किल्ल्यांवर, त्यांना कसला उपेग त्या धा लाखाचा ? दानच करून टाकतीन ते कुनालातरी. आपन आसं करू, तुमी मोजून पाच गड-किल्ल्यांची लोकेशन आनि नावं सांगा, पुरस्कार तुमालाच द्यू ना आपन, हाय काय अन नाय काय. पुरस्काराच्या धा लाखात एखादी झक्क एशी गाडी-बिडी यील ना भाऊ !!!
बेरकी बोका,
ओंकार आठवले.


No comments:
Post a Comment