आज माझ्या एका भावाचा लग्नानंतरचा दुसरा पाडवा. आमच्याकडे आलेत. त्यांना फिरवण्याची म्हणजेच ड्रायव्हरगिरीची जबाबदारी माझ्यावर आहे. सिंगल असणं फार बरंय बाबा… एक तास झाला गाडीत बसलोय. शांतपणे भरलेले खिसे रिकामे होताना बघतोय. वहिनीच्या चार साड्या घेऊन झाल्यात. अजून एक ड्रेस हवाय. साड्यांवर म्याचींग चप्पल्स घेऊन झाल्यात. भावाची एका जीन्स आणि टीशर्ट वर बोळवण झालीय. तीन पिशव्या गाडीत ऑलरेडी आल्यात. अजून किती येतायत कुणास ठाऊक. लग्नानंतर इतकं कापतात की काय ?? दादाच्या नक्की भावना कळायला मार्ग नाहीये. बहुधा जेवण झाल्यावर शतपावली करताना हळूच सांगेल - "बोक्या, तुझ्या वहिनीने आज मजबूत कापलाय मला"… बरंय बाबा माझं पाकीट मात्र सेफ आहे. कुणी उग्गाच हट्ट करणार नाही. माझ्या मनाप्रमाणे, आवडीप्रमाणे पाकीट वापरीन. कश्शाला ना आपण नसत्या फंदात पडा.
असो.
तूर्तास शाबजी आणि मेमसाब येण्याची वाट बघतोय.
डायवर बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment