आता तरी प्लास्टिक मनी वापरायला लागा रे.
कमीत कमी कॅश वापरा. एखाद्या ठिकाणी कॅशच लागते वगैरे आपण म्हणतो म्हणून.
माणूस कितीही मोठा असो वा लहान, त्याचं किमान एक खातं असतंच असतं. मला नाही वाटत आता अकाउंट आहे पण त्यातून पैसे काढण्याच्या मार्गांबद्दल लोक अनभिज्ञ असतील. आपल्या खात्यातून चेक / ATM कार्ड ने पैसे काढू शकता. भाजीवाले, दूधवाले, रिक्षावाले करंट अकाउंट काढतात, त्यात पैसे भरा, चेक ने payment करा, money ट्रान्सफर करा. हवे तितके मार्ग आहेत कॅशलेस कामकाज करण्याचे.

फक्त कॅशच हवी ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे.
आणि कॅशलेस काम करणं अवघड नाहीये अजिबात. माझ्याकडे क्रेडिट कार्ड नाहीये, मी फक्त डेबिट कार्ड वापरतो.
रोज सकाळी घरातून तुम्ही स्टेशनला येता ते रिक्षाने, एखाद्या रिक्षावाल्याबरोबर बोलून घ्या, महिन्याचे पैसे ठरवून घ्या आणि चेकने द्या. मुलांना शाळेत सोडायला जाणार्या रिक्षेला नाही का देत तुम्ही महिन्याचे पैसे ?? दूधवाले, किराणावाले, इस्त्रीवाले या सगळ्यांना जर तुम्ही ठरवलंत तर आणि तरच विना कॅश काम करायला काहीच हरकत नाही.

माझं स्वतःचं उदाहरण देतो,
सकाळी घरून स्टेशनला यायला लागणारे दहा रुपये - कॅश ने
रेल्वेचा पास - रेल्वे स्टेशनच्या बाहेरच, अधिकृत तिकीटविक्री खिडकी असते, private चालवायला दिलेली, तिथे card swipe करतात, मी पास तिथूनच काढतो आणि माझं रेल्वे स्मार्ट कार्ड तिथेच रिचार्ज करतो.
मेट्रोच्या कार्डचं रिचार्ज ऑनलाईन करता येतं.
मुंबईत कामानिमित्त फिरायला ओला / उबर आहे. त्यांच्या मोबईल वॉलेट मध्ये पैसे भरून ठेवलेत तर तुमचं भाडं त्यातून वळतं होऊन जातं.
मॅक्सिमम मेडिकल शॉप्स मध्ये कार्ड स्वाईप होतं.
जेवणाच्या डबेवाल्या मावशींना चेकने पैसे महिन्याचे देतो. हॉटेलात गेलो तर तिथेही कार्ड चालतं.
कपडे लत्ते, बूट, वगैरे वगैरे पर्सनल वस्तू सुद्धा कार्ड स्वाईप करून घेऊ शकतो.
मोबाईल कंपन्यांची स्वतःची apps आहेत, त्यावर थेट रिचार्ज करता येतं.
प्रत्येक पेट्रोलपंपावर कार्ड चालतं, तिकीट बुकिंग ऑनलाईन होतं.
लोक म्हणतात लग्नकार्य वगैरेमध्ये कॅशच लागते, कशाला लागते कॅश ?? घोडेवाले सुद्धा चेक घेतात, केटरर चेक घेतात, फुलं वगैरे तर तुम्ही लॉटमध्ये घेता, तेव्हा तो फुलवाला चेक घेऊच शकतो. मी स्वतः event management मध्ये असल्यामुळे मला या व्यवहाराची नीट माहिती आहे. जर तुम्ही ठरवलंत की कॅश द्यायचीच नाही, तर चेकला कोणीही नाही म्हणू शकत नाही, कारण शेवटी व्हेंडरला पैसेच हवे असतात.

आता मला सांगा, अशी किती कॅश लागली मला दिवसभरात ??
प्रश्न हा आहे, की कॅश दिली प्रश्न मिटला किंवा व्यवहार पूर्ण झाला, या मानसिकतेतून आपण कधी बाहेर पडणार याचा...
आता तुम्ही म्हणाल, मुंबईत या सगळ्या गमज्या चालतात, गावाकडे काय ??
प्रत्येक गावात किमान एक बँक आहे, आता बँक आहे म्हणजे इंटरनेट आहे, इंटरनेट आहे म्हणजे ऑनलाईन करता येणारी सगळी कामं तुम्ही करूच शकता.
आणि कॅशने काम अजिब्बात करू नका असं कोणीच म्हणत नाहीये, चहावाल्याला भजी वडेपाववाल्याला तुम्ही ऑनलाईन देऊ शकत नाही पैसे, तिथे कॅशच लागते मान्य आहे, पण जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिथे तिथे निग्रहाने कॅश टाळणं आपल्याच हातात नाही काय ?? गरज आहे ती सामान्यांना या कॅशलेस ऑनलाईन सुविधेची माहिती करून देण्याची...

सामान्य नागरिक बोका

No comments:
Post a Comment